राजकुमारीच्या स्वप्नातून ड्रॅगनच्या पंखांपर्यंत…
राजकुमारीच्या स्वप्नातून ड्रॅगनच्या पंखांपर्यंत… ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज कधी कधी स्वप्न तुटणं म्हणजे प्रवास संपणं नसतं; उलट आपल्या आत दडलेल्या सामर्थ्याची पहिली ओळख असते. एका WhatsApp Status वर सहज नजर गेली— “I failed as a Disney Princess, I’m a Dragon now.” वाचलं… हसलो… आणि पुढे जाणार होतो. पण त्या एका वाक्याने पुन्हा मागे खेचलं. कारण वरवर पाहता गंमतीदार वाटणाऱ्या त्या शब्दांमध्ये मला एक वेगळीच गोष्ट दिसली—एका ‘Princess’चा पराभव नव्हे, तर एका ‘Dragon’चा जन्म! कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो. आपण मनात रंगवलेली सुंदर गोष्ट प्रत्यक्षात तशी घडत नाही. अपेक्षा तुटतात, प्रयत्न अपुरे पडतात, माणसं बदलतात, एखादं स्वप्न हातातून निसटतं. आणि तेव्हा प्रश्न असतो— “आता काय?” उत्तर कदाचित त्या Status मध्येच आहे— आता स्वतःचे पंख शोधायचे! 🐉 “I failed as a Disney Princess, I’m a Dragon now.” पण पुन्हा एकदा ती ओळ वाचली आणि जाणवलं—ही केवळ गंमतीदार ओळ नाही. तिच्यामागे कदाचित एक अनुभव आहे, एखादी निराशा आहे, अपेक्षाभंग आहे… आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुन्हा उभं राहण्याच...