पोस्ट्स

मीटिंग की (M) eating?

इमेज
  मीटिंग की (M) eating? ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज बैठकीची सूचना आली की पूर्वी लोक विचारायचे, “विषय काय आहे?” आता विचारतात, “जेवणाची व्यवस्था काय आहे?” या एका प्रश्नात आपल्या बैठकींच्या उत्क्रांतीचा बराच मोठा इतिहास सामावलेला आहे. विषय कितीही गंभीर असो, व्यवस्था चोख हवी. प्रश्न प्रलंबित राहिला तरी चालेल; पण नाश्ता प्रलंबित राहता कामा नये! परवा एका बैठकीच्या तयारीची लगबग सुरू होती. फाईली तयार होत्या. सादरीकरण तयार होते. मागच्या बैठकीत न सुटलेले प्रश्नही नव्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सज्ज होते. इतक्यात फोन वाजला. “उद्याच्या बैठकीचं सगळं ठरलं ना?” “हो. विषयपत्रिका पाठवली आहे.” “ते ठीक आहे. सकाळी नाश्त्याला काय ठरवलं?” संयोजकाने विषयपत्रिका हळूच बाजूला ठेवली. बैठकीच्या खऱ्या तयारीला आता सुरुवात झाली होती. “पोहे आणि चहा ठेवू म्हणतोय.” पलीकडे क्षणभर शांतता पसरली. जणू संयोजकाने संस्थेच्या भवितव्यावरच घाला घातला होता. “नुसते पोहे? काहीतरी गरम पाहिजे.” पोहे गरमच असणार होते; पण ‘गरम’ हा इथे तापमानाचा विषय नव्हता. तो प्रतिष्ठेचा विषय होता. शेवटी वडा-सांबार ठरले. त्यावर कुणीतरी इ...

करंगळीचा आधार…

इमेज
करंगळीचा आधार… (एखादं काम मनापासून केलेलं असेल, तर त्यापासून दूर होणं सहज जमत नाही. आपल्या अनुपस्थितीत काही बिघडलं, तर? आपण पकड थोडी सैल केली आणि कुणाचं नुकसान झालं, तर?) ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज केंद्राच्या वरच्या मजल्यावरील वर्गात प्रशिक्षण सुरू होतं. व्हाईटबोर्डवर काही रेषा उमटत होत्या. प्रयोगशाळेत एखाद्या उपकरणाभोवती उत्सुक चेहरे जमले होते. ग्रंथालयात पुस्तकाची पानं उलटली जात होती. उपहारगृहाच्या स्वयंपाकघरातून वाफ उठत होती. कार्यालयात कुणीतरी नव्या फाइलवर तारीख लिहीत होतं. सगळं आपल्या जागी होतं. फक्त हे सगळं पेलणारा माणूस आपल्या जागी नीट उभा राहू शकत नव्हता. त्याचे गुडघे वाकले होते. खांद्यांवरचा खडक त्वचेत रुतत होता. कपाळावरून ओघळणारा घाम पुसायलाही हात मोकळा नव्हता. थोडं हलावं म्हटलं, तर वर कुठेतरी एखादं टेबल डळमळेल, कुणाचं काम थांबेल, कुणाची गैरसोय होईल, अशी भीती त्याला वाटत होती. म्हणून तो स्वतःची गैरसोय सांभाळत उभा होता. सुरुवातीला हा भार एवढा नव्हता. एका विभागाकडून एक काम आलं. त्याने केलं. मग दुसरं आलं. तेही केलं. दुसऱ्या विभागानं अडचण सांगितली, तेव्हा त्याने त्याच्याही काम...

सगळं सांभाळतोय… पण मला सांभाळणार कोण?

इमेज
  सगळं सांभाळतोय… पण मला सांभाळणार कोण? सगळ्यांना सांभाळणाऱ्या माणसालाही, कधीतरी निश्चिंतपणे टेकण्यासाठी एक खांदा हवा असतो. ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज रात्री घराचे दार उघडताना त्याच्या हातात फोन होता. पलीकडून कुणीतरी उद्याच्या कामाबद्दल सांगत होते. त्याने बूट काढले. पिशवी खाली ठेवली. घरातल्या माणसांकडे पाहून हलकेच हसला आणि फोनवर म्हणाला— “हो, काळजी करू नका. मी बघतो.” दिवसभरात कितव्यांदा हे वाक्य म्हटले होते, त्याला आठवत नव्हते. फोन संपला. घरातून विचारणा झाली, “जेवण वाढू?” त्याने मान हलवली. समोर ताट आले. पहिला घास घेतानाच आणखी एक संदेश आला. त्याने उत्तर दिले. मग दुसऱ्या संदेशात एक कागद मागितला होता. पिशवीतून संगणक काढताना तो म्हणाला, “तुम्ही जेवा. मला थोडा वेळ लागेल.” घराला हे वाक्य परिचयाचे झाले होते. ताट त्याच्यासाठी थांबले. माणसेही थांबली. दिवस मात्र त्याला सोडायला तयार नव्हता. त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता. अडचण आली की त्याला फोन करायचा. काम अडले की त्याच्याकडे पाठवायचे. कुणी उपलब्ध नसेल, तर त्याने व्यवस्था करायची. एखादी चूक झाली, तर त्याने सावरायचे. त्याला का...

यशात वाटेकरी… कामात खांदेकरी!

इमेज
यशात वाटेकरी… कामात खांदेकरी! ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज समारंभ संपला होता. टाळ्यांचा आवाज अजून सभागृहात रेंगाळत होता. मंचावरील दिवे उजळलेले होते. पुष्पगुच्छांच्या रंगांत आणि छायाचित्रांसाठी जमलेल्या चेहऱ्यांत यशाचा आनंद ओसंडत होता. “हे आपल्या सर्वांचे यश आहे!” वाक्य उच्चारले गेले आणि पुन्हा टाळ्या वाजल्या. खरेच, यश सर्वांचे असावे. आनंदाला कुंपण कशासाठी? एखाद्या कामातून चांगले घडले, तर त्याचा अभिमान प्रत्येकाला वाटावा. पण छायाचित्रात सगळ्यांना सामावून घेण्यासाठी थोडे मागे सरकताना, एका माणसाच्या मनात प्रश्न आला— आज माझ्याशेजारी उभे असलेले हे खांदे, कामाच्या वेळी कुठे होते? त्याने प्रश्न बोलून दाखवला नाही. चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवले. कॅमेरा चमकला. सर्वांचे यश एका चौकटीत बंद झाले. त्या चौकटीबाहेर मात्र अनेक दिवसांचा प्रवास होता. उत्तर न मिळालेले फोन होते. पुन्हा पुन्हा केलेला पाठपुरावा होता. शेवटच्या क्षणी बदललेले नियोजन होते. मिटलेली अडचण आणि लगेच उभी राहिलेली दुसरी अडचण होती. कधी दुपारचे जेवण संध्याकाळी झाले होते. कधी घरी पोहोचल्यानंतरही कार्यालयाचा दिवस संपला नव्हता. घरातून “आता तरी ...

तिचं प्रेम अभंग राहिलं… विश्वास मात्र भंग झाला

इमेज
तिचं प्रेम अभंग राहिलं… आमचा विश्वास भंग झाला (एक गोष्ट मात्र खरी— आज मनात पूर्वीसारखा ओलावा उरलेला नाही, म्हणून कालचा जिव्हाळा खोटा ठरत नाही. तो तेव्हा खरा होता. अगदी निखळ होता. कदाचित म्हणूनच आजची वेदनाही इतकी खरी आहे. जिथे काहीच नसतं, तिथे काही तुटतही नाही. तडा त्यालाच जातो, जे कधीतरी घट्ट जोडलेलं असतं.) ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज तिचा प्रेमावर विश्वास होता. आणि त्यांचं विश्वासावर प्रेम होतं. दोन्ही भावना खऱ्या होत्या. दोन्ही आपापल्या जागी निर्मळही असतील. तरी एका वळणावर असं काही घडलं की तिचं प्रेम अभंग राहिलं आणि एका नात्याच्या पायाला नकळत तडा गेला. दुःख तिच्या प्रेमाचं नव्हतं. मनाने कुणाकडे ओढ घ्यावी, कुणाच्या सहवासात आपलं उद्याचं आयुष्य पाहावं, कुणाचा हात धरून पुढची वाट चालावी—हे शेवटी त्या मनानेच ठरवायचं असतं. प्रेमाला आज्ञा देता येत नाही. त्याला जातीची, प्रतिष्ठेची, अपेक्षांची किंवा समाजाने आखून दिलेल्या चौकटींची भाषा नेहमीच समजते असंही नाही. वेदना प्रेमाची नव्हती. ती होती— आपण इतके जवळ असूनही एखाद्या महत्त्वाच्या सत्यापासून इतके दूर कसे राहिलो? नात्यांना दुखावणारे...

विसर्जन

इमेज
  विसर्जन (विसर्जन म्हणजे नष्ट करणं नाही. पाण्यात उतरलेली माती नष्ट होत नाही. फक्त तिचा आकार विरघळतो. कालपर्यंत तिला डोळे होते, हात होते, मुकुट होता, एक ओळख होती. आज ती पुन्हा माती होते. निसर्गाला बहुधा “संपलं” हा शब्द माहीत नसावा. त्याला रूप बदलणं माहीत असतं.) ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज संध्याकाळ नदीच्या पाण्यावर उतरू लागली होती. रस्त्यावर अजूनही गुलाल होता. दूरवर ढोलांचा आवाज घुमत होता. गर्दीतून गणपतीची मूर्ती हळूहळू घाटाकडे सरकत होती. कुणी नाचत होतं. कुणी घोषणा देत होतं. कुणी मोबाईलमध्ये शेवटचे क्षण साठवत होतं. आणि मी गर्दीच्या थोडा मागे, शांतपणे चालत होतो. दहा दिवस घरात मुक्कामाला आलेला देव आज निरोप घेत होता. ज्याच्यासाठी मखर सजवलं, फुलं आणली, आरत्या म्हटल्या, नैवेद्य ठेवला; ज्याच्या येण्याने घरात प्रसन्नता भरली—त्यालाच आज आपल्या हातांनी उचलून नदीपर्यंत न्यायचं होतं. आणि तिथे पोहोचल्यावर... सोडून द्यायचं होतं. केवढा विलक्षण विधी! आयुष्य आपल्याला जपायला शिकवतं. माणसं जपायची, नाती जपायची, आठवणी जपायच्या. पण काहीतरी मनापासून जपल्यानंतरही एक दिवस ते हातातून सोडावं ला...

तडा विश्वासाला जातो… मायेला नाही

इमेज
  तडा विश्वासाला जातो… मायेला नाही (दोन माणसं एखादी सामाजिक सीमा ओलांडून एकमेकांच्या जवळ आली की परीक्षा फक्त त्यांच्या प्रेमाची राहत नाही. त्यांच्या भोवतालच्या नात्यांचीही सुरू होते. “कोण बरोबर–कोण चूक?” यापेक्षा एका प्रेमाला जपताना दुसऱ्या नात्यातील विश्वास नकळत जखमी होऊ शकतो—आणि तरीही माया शिल्लक राहू शकते. हा या लेखाचा केंद्रबिंदू आणि मध्यवर्ती कल्पना ) ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज काही नात्यांना नाव आधी मिळतं आणि माया नंतर. काही नात्यांचं मात्र उलट असतं. माया आधी रुजते. नातं नंतर आकार घेतं. रक्ताचा पुरावा नसतो. अधिकाराची सनद नसते. समाजाने ठरवून दिलेल्या नात्यांच्या चौकटीत त्यांच्यासाठी नेमकी जागाही नसते. तरी एखादी व्यक्ती नकळत आपल्या जगण्याचा इतका सहज भाग बनते की तिच्या आनंदाने आपला दिवस उजळतो, तिच्या काळजीने आपली रात्र अस्वस्थ होते आणि तिच्या उद्याचा विचार आपल्या प्रार्थनेत कधी सामील झाला, हे आपल्यालाही कळत नाही. अशा नात्यांत मालकी नसते. पण माया असते. अधिकार नसतो. पण विश्वास असतो. आणि कधी कधी अधिकार नाकारला जाण्यापेक्षा विश्वासाच्या वर्तुळाबाहेर आपण उभे होतो, ही जाणीव अधिक ...