पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनाच्या पाऊलखुणा…

इमेज
 जीवनाच्या पाऊलखुणा… ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी जीवन म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर उमटलेल्या खुणा— काही लाटांच्या बेभान धावांनी क्षणात पुसून जातात, तर काही खोलवर रुतून मनाच्या वाळूत दगडी शिलालेखासारख्या कायम राहतात. काही आयुष्यं… रेल्वेच्या दीर्घ प्रवासासारखी— गावोगावी थांबणारी, धुरकट, पण शेवटी फक्त दोन आकडे उरवून जाणारी— जन्माचा, मृत्यूचा. त्या दोन आकड्यांच्या मध्ये मात्र कधी कधी जगणं रिकामं— न पाझरलेलं, न झिरपलेलं, फक्त वाहून गेलेलं. आणि काही जीवनं? फुलपाखरांच्या क्षणिक पंखांसारखी— कमी जगतात, पण रंगांची उधळण अशी करतात की त्यांच्या मागे आकाशभर इंद्रधनुष्य फुलतं. एखादा सहज हसरा चेहरा, एखादी शब्दरहित मिठी, एखादं साधं विचारपूस करणं— हीच ती देणगी, जी जगून झाल्यावरही जिवंत ठेवते. जसा पहिला पाऊस— क्षणभर पडतो, पण सुगंध शाश्वत करून जातो. तसंच काही माणसं— जगतात अल्प, पण स्पर्श कायमस्वरूपी. दिवाणखान्यातल्या भिंतीवर लटकलेला एक फोटो दररोज नजरेला कुजबुजतो— “मी थोडंसं जगलो, पण प्रत्येक क्षण मनसोक्त जाळून टाकला, आणि तुझ्या अंधाऱ्या वळणांवर एक दिवा पेटवून ठेवला.” खरं तर जीवन मोजायचं ते वर्षांनी नाही...

तू ठीक आहेस ना?

इमेज
  तू ठीक आहेस ना?-  ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी कोरड्या शब्दांचं गूढ जीवनात कधी कधी अशी वळणं येतात की शब्दच हरवून जातात. ज्या मनाला लहानशा गोष्टींनी पाणी यायचं, तेच मन अचानक वाळवंटासारखं कोरडं—कडक—कडवट होतं. एकेकाळी फुलपाखरांच्या रंगांत न्हालेलं आयुष्य, एका क्षणात काटेरी झुडपांत फेकलं जातं. उमेद शरमते, हास्य मागे सरकतं, आणि हृदयाचा झरा आटतो. पूर्वी प्रश्नांमध्येही गोडवा असायचा— “हा रंग कोणत्या रंगात मिसळून तयार झाला असेल?” आज तोच प्रश्न विषासारखा छातीत घाव घालतो— “हे का घडलं?” उत्तर हाताशी नाही. जणू आयुष्याने आपल्याकडून सोपी कोडी हिसकावून घेतलीत, आणि त्याजागी न सुटणारं गूढाचा जड ग्रंथ ठेवला आहे. मन खरं तर पावसासारखं असतं. कधी टिपूर बरसतं, कधी शांतपणे अंगण भिजवतं. पण वादळानं दिशा मोडली, की ढगांत फक्त वीजांचा गडगडाट उरतो—थेंब मात्र फुटत नाहीत. तोच कोरडेपणा आत्म्याला झिजवतो. याक्षणी मनाला हवी आहे फक्त एकच ओल— चार अक्षरी साधं वाक्य: तू ठीक आहेस ना ? तेही नसेल, तर हृदय खरंच पाषाण होतं. खरं गूढ इतकंच— ज्यांच्या डोळ्यांतून कधी निरागसतेनं पावसासारखे प्रश्न झरत होते,...

अश्रूंचं अधुरं गाणं

इमेज
अश्रूंचं अधुरं गाणं ताल हरवला की जीवन केवळ वेदना ठरते ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी विरहाचा अव्यक्त गहिरा स्वर… जीवन कधी कधी अशा गाण्यासारखं होतं, ज्यात स्वर आहेत पण श्वास नाही, ओळी आहेत पण लय नाही. हृदय धडधडतं, पण जिवंतपणाचं भान विरून जातं. आपण संपूर्ण सामर्थ्याने उभे असतो, तरीही काळ एकाएकी पोकळ करून टाकतो. जणू नाजूक काडीला वादळानं चिरडून टाकावं तसं जगणं मोडून कोसळतं. आपल्या हातात काहीच राहत नाही—आणि ज्या क्षणी आपल्या अस्तित्वाला सर्वाधिक आधार हवा असतो, त्या क्षणी आपणच सर्वाधिक असहाय्य उभे आहोत, असं जाणवतं. मानवी मनाला वेदनेचा जसा एक कळस असतो, तसा तो दिवस नकळत येतो. कुणी आपलं, कुणी जिव्हाळ्याचं, कुणी अगदी अंतःकरणाला भिडणारं—कोणीतरी दूर जातं. देह नजरेतून नाहीसा होणं सहन करता येतं, पण नातं अंतःकरणातून दुरावणं ही काळजाला फाडून टाकणारी जखम असते. कारण जेव्हा ओळखीच्या सावल्या डोळ्यांना दिसेनाशा होतात, तेव्हा हृदयावर न सांगता येणारं काळं दाटून येतं. जीवनाच्या वाटेवर माणूस जरी कणखर असला तरी काही प्रसंग असे असतात की जिथे शक्ती नुसती उरते—पण व्यर्थ ठरते. वेळ हातून निसटतो, नाती डोळ्यांआड जातात,...

रक्ताचं नातं, मनाचं ओझं | बापलेकीचं नातं आणि जीवनाचं गमक – हृदयस्पर्शी मराठी लेख

इमेज
  रक्ताचं नातं, मनाचं ओझं ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी  घरात पहिल्यांदा पाळण्यात बाळ आलं, तेव्हा वाटलं— “फुलपाखरं अंगणात उतरलीत की काय!” नवं बाळ म्हणजे केवळ एक जीव नव्हे, तर पिढ्यांचा वारसा जणू एका क्षणात आकार घेतलेला. स्वतःचं अपत्य नसतानाही, त्या नव्या जीवाला हातात उचलणं— हे बाप होण्याच्या सुखाच्या अगदी शेजारी उभं असलेलं एक वेगळंच दार होतं. कधी डोक्यावर उचलतो, कधी खांद्यावर बसवतो, कधी हात धरून चालायला शिकवतो… आणि नकळत आपण अधुरे बाप बनून जातो. हसण्यात लपलेली ओल, कौतुकात दडलेली जबाबदारी, आणि प्रेमामागे शांतपणे थडकणारी काळजी— हे सगळं नकळत मनात घर करून राहतं. पण काळाचा काय? तो तर फक्त चालतो. बालपणातून तारुण्य जन्म घेतं, आणि मग एक दिवस तोच जीव स्वतःचे निर्णय घेतो. तेव्हा मनाच्या जखमा उघड्या पडतात. “ बाळाचं पहिलं पाऊल त्याला चालायला शिकवतं, पण आयुष्याचं पहिलं पाऊल पालकांना पांगळं करून जातं.” —हे ऐकलं होतं कधीतरी… आज अगदी जगून उमजतं. आपण ज्याला डोळ्यांत जपलं, हातात सांभाळलं, स्वप्नांत उभं केलं— तो जर वेगळा मार्ग निवडतो, तर ती फक्त त्याची पावलं नसतात; आपल्या हृदयावर उमटलेल...

श्री. दिलीप बी. राजूरकर साहेब…२८ वर्षांची निष्ठावान सेवा – कर्तव्यनिष्ठेचा उज्ज्वल प्रवास

इमेज
  🌸 गौरवपत्र  🌸 लेखन- सुनिलदत्त कुलकर्णी जेजुरी आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, सहकारी बांधव आणि आजच्या या सोहळ्याचे केंद्रबिंदू – आदरणीय श्री. दिलीप बी. राजूरकर साहेब… वीज ही केवळ ऊर्जेची साधनं नाहीत, ती विकासाचा श्वास आहे. या श्वासाला सातत्याने स्पंदन देणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये राजूरकर साहेबांचं नाव अग्रस्थानी आहे. २८ वर्षांचा अखंड सेवायज्ञ – कनिष्ठ अभियंत्यापासून कार्यकारी अभियंता पदापर्यंतची उंच भरारी, ग्रामीण विजेची सेवा, चाचणी विभागातील १५ वर्षांची कार्यनिष्ठा, आणि शेवटची ४०० के.व्ही. कुंभारगाव उपकेंद्र प्रमुख म्हणून  जबाबदारी – या प्रवासातील प्रत्येक टप्पा हे समर्पण आणि प्रामाणिकतेचं तेजस्वी उदाहरण आहे. ५०० MVA ICT सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी, महत्त्वाच्या उपकेंद्रांची चाचणी, आणि ग्राहकसेवेला केंद्रस्थानी ठेवलेली कार्यशैली – या सर्वांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता, सौजन्यशीलता आणि Ownership – हे आपल्या कामाचे मूल्य आज आमच्यासाठी प्रेरणा ठरत आहेत. साहेब, आपण सेवानिवृत्त होत आहात, पण आपल्या कार्याचा प्रकाश आणि ...

लक्ष्मणरेषा – संरक्षण की कैद?

इमेज
  लक्ष्मणरेषा – संरक्षण की कैद? ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी   लक्ष्मणरेषा – संरक्षणाची खूण की स्वातंत्र्याची कैद? रामायणातील रूपकातून आजच्या समाजातील मर्यादा, बंधनं आणि विश्वासाच्या रेषांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक लेख. लक्ष्मणरेषा, मर्यादा, स्वातंत्र्य, समाज, रामायण, नातेसंबंध, संरक्षण, बंधन, विचारप्रवर्तक लेख, मराठी ब्लॉग, सामाजिक समीक्षा प्रस्तावना: रेषा म्हणजे फक्त जमिनीवरची रेषा किंवा कोड नाही; ती मनाच्या, नात्यांच्या आणि विचारांच्या सीमा आखते. प्रत्येक रेषेच्या मागे सुरुवातीला काळजी असते – “ही तुझ्यासाठीच”, “ही तुझ्या भल्यासाठी”. पण जेव्हा ती काळजी बंधनात रूपांतरित होते, तेव्हा प्रश्न पडतो – ती रेषा संरक्षणाची आहे की कैद देणारी?  रामायणातील लक्ष्मणरेषा – प्रेमाचे संरक्षण की बंधन? रामायणातील लक्ष्मणरेषा आपल्याला विचार करायला लावते. लक्ष्मणाने ती सीतेच्या सुरक्षिततेसाठी आखली, पण त्या रेषेने तिच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा ठेवल्या. संरक्षण आणि बंधन यांच्यातला हा संघर्ष आजही आपल्या जीवनात दिसतो – घर, नोकरी, समाज, मनाच्या भीतीत.  आधुनिक जीवनातील लक्ष...

लक्ष्मणरेषा

इमेज
लक्ष्मणरेषा ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी  रेषा… माणसाच्या अस्तित्वाचा अदृश्य, पण घट्ट पकडून ठेवणारा नकाशा. पहिला श्वास घेतल्याक्षणीच ती कुणीतरी आखून ठेवते— कोणत्या घरात जन्मायचं, कोणत्या देवळात नाव ठेवायचं, कोणत्या आडनावानं ओळखलं जायचं. आणि मग सुरू होतो एक न संपणारा पट— धर्माच्या, जातीच्या, प्रतिष्ठेच्या, नात्यांच्या, ‘संस्कार’ नावाच्या अदृश्य पण असह्य रेषांचा. आपण त्यातच वाढतो, शिकतो, हसतो, रडतो… आणि हळूहळू त्या रेषांनाच "मर्यादा" म्हणून गौरवायला लागतो. कारण? त्या नसल्या, तर आपण हरवून जाऊ, आपली ओळख पुसून जाईल— अशी भीती आपल्याला जखडून टाकते. लहान मूल पहिल्यांदा मातीचा गणपती घडवतं. त्याच्या लटपटणाऱ्या बोटांनी काढलेल्या विस्कटलेल्या रेषांमध्ये आपण सौंदर्य शोधतो. का? कारण ती कृती आपल्याला रुचते. आपल्या परंपरेच्या चौकटीत बसते. तो देव आपल्याला "आपला" वाटतो— कारण तो आपल्या आखलेल्या मर्यादांच्या घरट्यात मावतो. पण हेच मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या मनानं कोणावर प्रेम करतं— आणि ती रेषा आपल्या आखलेल्या वर्तुळाबाहेर सरकते. तेव्हा तोच मुलगा—तोच देव घडवणारा हात— अचानक परका वाटायला...

🌿 मूळं हरवलेलं घर 🌿

इमेज
  🌿 मूळं हरवलेलं घर 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी काही नात्यांना आवाज नसतो… पण त्यांच्या श्वासाने घर जिवंत राहतं. आईच्या हाताला चिकटलेला चुलीचा वास, वडिलांच्या कपाळावरचं घामाचं थेंब, आणि भिंतींमध्ये साठवलेली आपल्या हसण्याची गूंज— हीच घराची खरी ओळख. पण जेव्हा ही मुळे हलतात… घर उभं राहतं, तरीही आतून कोसळून जातं. हीच गोष्ट आहे—मूळं हरवलेलं घर. घरांना मुळे असतात… दिसत नाहीत, पण हृदयाच्या ठोक्यासारखी धडधडत असतात. भिंतींमध्ये वडिलांचे घामाचे थेंब लपलेले असतात, अंगणात आईच्या बोटांचा गंध पसरलेला असतो, आणि प्रत्येक कोपऱ्यात—कधीकाळी घुमलेला हास्याचा प्रतिध्वनी अजूनही श्वास घेतो. आणि मग— एका सकाळी, त्या घरातला आपला श्वास हरपतो. "मी माझं ठरवलंय…" एवढंच. बाहेर निघालेल्या पावलांच्या तालावर घराच्या भिंतीं आपलं हृदय फोडून घेतात  दरवाज्याशी उभं राहिलेलं "आनंदी राहा" हे वाक्य, डोळ्यांतल्या निःशब्द पाण्यात विरघळून जातं. काळ पुढे जात राहतो… सुरुवातीची धावपळ, रंग, उत्साह—सगळं फिकं होतं. पण जेव्हा जीवनाचा भार खांद्यावर ठेचतो, तेव्हा उमगतं— त्या घरात दोन कान ह...

🌿 अंतःकरणाचा दीप 🌿

इमेज
  🌿 अंतःकरणाचा दीप 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी जीवनाची दिशा ही बाहेरच्या दिव्यांमध्ये, परिस्थितीच्या अनुकूलतेमध्ये किंवा कुणाच्या सल्ल्यामध्ये नसते. खरी दिशा ती अंतःकरणातल्या दीपाजवळ असते. बाहेर कितीही उजेड असेल, तरी मनात अंधार असेल तर पावलं भरकटतात. पण मनातला एक लहानसा दीप प्रज्वलित झाला की, जगातल्या कोणत्याही धुक्याला मार्ग अडवता येत नाही. लोकं यशाचं रहस्य बाहेर शोधत फिरतात—कुणी ते नशिबात बघतात, कुणी वेळेत, कुणी परिश्रमांत. पण यशाचा खरा गाभा हा विश्वासात असतो—स्वतःवरच्या, आपल्या स्वप्नांवरच्या, आपल्या क्षमतेवरच्या विश्वासात. शेतकरी पावसाच्या पहिल्या सरीत बीज पेरतो. त्याला ठाऊक नसतं—पाऊस वेळेवर येईल का, माती साथ देईल का. पण तो पेरतो, कारण त्याच्या अंतःकरणातला दीप त्याला कुजबुजतो— “ही बीजं उगवतील…” याच विश्वासातून त्याची घामाची प्रत्येक थेंब सर्जनशीलतेत परिवर्तित होते. खरं तर हरवणं हे इतर कुणी आपल्याला हरवून टाकल्यामुळे नसतं; आपण स्वतःलाच “जमत नाही” म्हटलं, तिथून पराभवाची सुरुवात होते. आणि उलट आपणच ठामपणे मनाला सांगितलं— “मी करू शकतो, मी हे पूर्ण करणारच!” तर मग जग...

अलक संच : मातीचा देव

इमेज
  अलक संच : मातीचा देव ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी अलक – १ लहानपणी मातीला देव बनवणारी ती बोटं… आज कुणाच्या तरी हातात हरवली. घरात देव बसलाय, पण देव मेला आहे – आणि घरही. अलक – २ एके काळी हशाने भरलेलं घर… आज आरतीतही शांतता. गणपती आहे, पण उत्सव हरवलाय – त्याच्यासोबत… तेही. अलक – ३ मातीच्या देवाला प्राण देणारा श्वास आज कुणा परक्या अंगणात वसतोय. इथं? देव शिल्लक… पण देवपण नाही. अलक – ४ त्या पावलांनी कधीकाळी अंगण फुलवलं होतं. आज तीच पावलं परक्या वाटेवर आहेत. इथं? अंगण कोमेजलंय… आणि मनही. अलक – ५ गणपतीच्या आरतीनंतर कुजबुज – "येऊन जा ग… एकदाच येऊन जा…" . भिंतींनी ऐकलं. देवानेही. पण प्रतिध्वनी सोडून काही आलं नाही. अलक – ६ कधीकाळी या हातांनी देवाला डोळे दिले होते. आज तेच डोळे देवाकडे पाहायलाही परत येत नाहीत. अलक – ७ आरतीचा दिवा पेटला, पण ज्याच्या प्रकाशाने घर उजळायचं – तो श्वास आज परक्या अंधारात आहे. अलक – ८ भिंतींच्या आत अजूनही "बाप्पा मोरया" घुमतंय, पण त्या आवाजात आता गोडवा नाही – फक्त विरहाची राख आहे. अलक – ९ देव विसर्जनाला ग...

(मा) "ती "चा देव... आणि प्राणवायू हरवलेलं घर

इमेज
  🌑 (मा) "ती" चा देव… आणि  प्राणवायू हरवलेलं घर 🌑 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी लहानसं होतं ते लेकरू… त्याच्या बोटांवर माती धरली की माती धडधडायची. त्या बोटांतून येणारा निखळ प्रकाश – मातीला देव करायचा. त्या देवाकडे पाहून घराच्या भिंती हसत. झोपाळ्याच्या दोऱ्या गात. बाबांच्या मांडीवर उबदार श्वास पडायचा – "बाबा, बघा ना… माझा बाप्पा हसतोय!" आणि बाबा डोळे पुसून हसत म्हणायचे – "माझं घर जिवंत आहे… कारण तू आहेस." …पण एक दिवस – दाराशी काळ उभा राहिला. तो आला आवाज न करता – पण मुळे उपटून गेला. बोटांवरची माती निसटली. डोळ्यांतला प्रकाश परक्या उजेडाकडे वळला. त्या हातांनी एक दूरचा हात धरला – थंड. अनोळखी. निर्दय. आणि मग – एक सकाळ दार आपटून बंद झाली. कडी लावली. आवाज नाही. निरोप नाही. फक्त… शांतता. नवं घर जन्मलं. जुनं घर हळूहळू मरायला लागलं. आज घरात पुन्हा बाप्पा आहेत – पण त्यांच्या डोळ्यांत प्रकाश नाही. मोदकांच्या गोडीत गंध नाही. फुलं कुजल्यागत सुगंध हरवून बसलीत. आरती सुरू होते – आवाज भिंतीवर आदळतो. प्रतिध्वनी परत येतो – थंड. मृत. भिंतीवरच...

दृष्टीआडचं सौंदर्य

इमेज
 🌿✨ दृष्टीआडचं सौंदर्य ✨ 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी 🕊️ जे डोळ्यांना दिसत नाही, तेच आत्म्याला भिडतं. जीवनाचं खरं सौंदर्य अनेकदा आपल्या नजरेआड दडलं असतं. आपण जे पाहतो ते केवळ परिणाम असतात – उमललेलं फूल, झळकलेलं यश, पूर्ण झालेलं स्वप्न. पण या परिणामांमागे असतो एक शांत, गूढ, अदृश्य प्रवास. बियाणं मातीत झोपतं तेव्हा वरवर पाहणाऱ्याला अंधार आणि शांतता दिसते. कुणालाच दिसत नाही त्याची धडपड. दिवसागणिक जमिनीवर काही उमलत नाही, पण मातीतल्या गर्भात मूळं सतत खोलवर, अधिक खोलवर जात असतात. आणि हीच अदृश्य धडपड एक दिवस हिरव्या अंकुराचा चमत्कार घडवते. मनुष्याच्या आयुष्यातही हेच होतं. वरवर काही बदल दिसत नाहीत म्हणून लोक समजतात प्रवास थांबला. पण आतल्या आत त्याचं मन संघर्ष करतं, विचारांच्या वादळात झुंजतं, ध्येयासाठी सतत जळत राहतं. हा नजरेआड प्रवासच त्याचं खऱ्या अर्थाने घडणं ठरवतो. शिल्पकार दगडावर घाव घालतो. पाहणाऱ्याला तो दगडच दिसतो. पण प्रत्येक घावामध्ये, प्रत्येक ठोक्यात, एक मूर्ती जन्म घेत असते. अखेरीस शिल्प समोर येतं; पण त्यामागे दडलेली हजारो घावांची कथा कुणाच्या डोळ्यांना कधीच दिसत नाही. जीवन...

*क्षणभंगुर आयुष्य, चिरंतन मैत्री*

इमेज
 *क्षणभंगुर आयुष्य, चिरंतन मैत्री* आयुष्य हे खरंतर एका क्षणाचं नाव आहे. जन्माच्या घंटानादापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास— एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीसारखा. कधी तेजाळून उजळणारा, कधी वाऱ्याच्या झुळुकीने थरथरणारा, आणि अखेरीस मंदावत जाऊन विझणारा. पण या क्षणभंगुरतेतही काही गोष्टी अमर ठरतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे *मैत्री*. मैत्री ही काळाच्या पलीकडची वीण आहे. ती नाती, जात, धर्म, स्थान, पद, प्रतिष्ठा यांना ओलांडून थेट हृदयाशी बोलते. जीवन कितीही वादळं, दुःखं, अंतरं घेऊन आलं तरी मैत्रीचा धागा तुटत नाही, उलट आणखी घट्ट होतो. आपला शालेय मित्र नितीन नाईक… आज तो आपल्यात नाही ही जाणीव असह्य वेदना देणारी आहे. त्याच्या आठवणी— शालेय गमती-जमती, नंतरच्या भेटीगाठी, आमच्या 1989 च्या दहावीच्या बॅचच्या रंगीबेरंगी क्षणांतला, रौप्य महोत्सवी कार्यक्रमातला त्याचा हसरा चेहरा— सगळं डोळ्यांसमोर फिरत राहतं. माणूस जातो, पण आठवणी कधी जात नाहीत. त्या आठवणी म्हणजेच खरी चिरंतनता. आणि त्या आठवणींच्या पायवाटेवरून चालताना उमगते. मैत्री म्हणजे केवळ सहवास नाही, तर आत्म्याला जोडणारा धागा आहे. जीवन आपल्याला क्षणभ...

आयुष्याचा रंगमंच

इमेज
  🌿 आयुष्याचा रंगमंच 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी मनुष्याच्या हातात खरंच कितीसं असतं? त्याची स्वप्नं, त्याची धडपड, आणि त्याच्या मनातली न बोललेली गाणी. पण जीवन? जीवन आपल्या इच्छेनुसार चालेल अशी अपेक्षा करणं म्हणजे क्षितिजाला गाठण्याचा प्रयत्न – दिसतं जवळ, पण प्रत्यक्षात नेहमी दूर. जीवन हा एक विराट रंगमंच आहे. येथे प्रेक्षकही आपणच, कलाकारही आपणच. पण दिग्दर्शक? तो मात्र अदृश्य – काळ, नियती, किंवा कोणीतरी उच्च शक्ती. पटकथा आपल्या हातात नसते, पण संवाद मात्र आपल्यालाच मनापासून म्हणायचे असतात. गीतेतील श्रीकृष्णाचं वचन – “स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।” ही जीवनभूमिकेची खरी किल्ली आहे. आपल्याला जी भूमिका दिली आहे, ती कितीही कठीण असली तरी तीच निभावणं हेच आत्म्याचं खरं कर्तव्य. कारण दुसऱ्याचा मुखवटा चढवणं म्हणजे आत्म्याला दगा देणं. बुद्धांनीही सांगितलं— “जीवन दुःखमय आहे, आणि त्या दुःखाचं मूळ आहे तृष्णा.” म्हणजेच आपल्या मनासारख्या भूमिका मिळाव्यात, सुखद संवाद लाभावेत, असं वाटणं हाच दुःखाचा उगम. स्वीकार म्हणजेच मुक्तीचा आरंभ. उपनिषदांचा निर्वाणीचा आवाज— “नाट्यं भुवनं, नटः जीवः, साक्...

"स्वतःला जपण्याची कला…"

इमेज
🌿 "स्वतःला जपण्याची कला…" 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी जीवन म्हणजे अखंड प्रवास. या प्रवासात काही वळणं आनंदाची फुलं उधळतात, तर काही वळणं काट्यांनी भरलेली वाट देतात. कधी परिस्थिती आपल्या मनासारखी झुकते, तर कधी ती हाताबाहेर जाऊन खडकासारखी अडथळा बनते. अशा क्षणी मनुष्य दोनच वाटांवर उभा राहतो — एक म्हणजे झगडत राहणे, तुटत राहणे; आणि दुसरी म्हणजे स्वतःला जपून, आतून बळकट होत पुढे जाणे. "ढगांचा गडगडाट थांबवता येत नाही, पण मनातल्या दिव्याला जपलं, तर अंधारही प्रकाशमान होतो…" खांद्यावरचं ओझं जड झालं की पहिला प्रश्न आपण स्वतःलाच विचारतो — हे मी हलकं करू शकतो का? शक्य असेल तर प्रयत्न करावा. पण जर त्या ओझ्याला हलकं करण्याची ताकद आपल्या हातातच नसेल, तर त्याला अंतःकरणात सामावून घेणं हाच उपाय असतो. स्वीकारणं हीच खरी शहाणपणाची कला आहे. तरीही काही वेदना अशा असतात, ज्या आत्म्याला कुरतडतात. त्या मनाच्या नसानसांत जळजळत राहतात, आणि सावलीसारख्या कायम मागे लागतात. अशा वेळी दूर जाणं हाच खरा उपाय असतो. कारण दूर जाणं म्हणजे पळ काढणं नव्हे; ते म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणं. निसर्ग...

ऊर्जेच्या तारा : विजेपलीकडचं नातं

इमेज
  🌿 ऊर्जेच्या तारा : विजेपलीकडचं नातं  🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी 🔆 प्रस्तावना वीज ही केवळ बल्ब उजळणारी शक्ती नाही, ती म्हणजे जीवनाच्या शिरांमध्ये वाहणारी धडधड आहे.  तारांतून वाहणाऱ्या अदृश्य प्रवाहामागे इंजिनिअर्स, लाईनमन, ऑपरेटर यांच्या हजारो झुंजी दडलेल्या असतात. पण खरी ऊर्जा केवळ विजेच्या तारा पुरवतात असं नाही— ती आपल्या नात्यांमधून, भावनांमधून, माणुसकीतून वाहत असते.  “तारा केवळ ॲल्युमिनियमच्या किंवा तांब्याच्या नसतात, काही हृदयातूनही जातात…” 🔌 वीजेच्या तारा आणि नात्यांच्या तारा लाईनमध्ये खंड पडला की अंधार दाटतो. नात्यांमध्ये संवाद हरवला की मनंही अंधारात बुडतात.  अंधार केवळ दिव्यातला नसतो, तो मनातही दाटून येतो… पण एका शब्दाच्या उजेडाने संपूर्ण आयुष्य उजळून निघतं. वीज टिकवण्यासाठी जशी झुंज द्यावी लागते, तशीच झुंज नात्यांना उजळून ठेवण्यासाठीही द्यावी लागते. ⚡ भावनांचा प्रवाह सबस्टेशनमधून अखंड प्रवास करणारा प्रवाह गाव उजळतो. तसंच— एक प्रेमाचं वाक्य, एक विश्वासाचा शब्द, एक आधाराचं हसू… हे जेव्हा नात्यांच्या सबस्टेशनमधून पुढे जातं, तेव्हा आयुष्य उजळून नि...

🌿 "अपूर्णतेतील पूर्णत्व…" 🌿

इमेज
  🌿 "अपूर्णतेतील पूर्णत्व…" 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी मनुष्याच्या प्रवासाला ‘अखेर’ असं काही नसतं. तो चालतो—कधी धावतो, कधी थांबतो, कधी अडखळतो, कधी दमतो, तर कधी पुन्हा उभा राहून नवी पावलं टाकतो. पण त्या सगळ्या वाटचालीचा गाभा म्हणजे ‘चालणं’च. आपण कुठे पोहोचतो हे नंतरचं; पण आपण चाललो, अनुभव घेतले, जाणवलं, उमटलं, हाच तर जीवनाचा खरा अर्थ आहे. गावाकडची एक पायवाट आठवते—जंगलातून जाणारी, वळणं घेत जाणारी. तिचा शेवटचा टप्पा कधीच ठरलेला नव्हता. प्रत्येक वळणावर वेगळी झाडं दिसायची, कुठे ओढा वाहायचा, कुठे डोंगराचं सावट अंगावर यायचं. ती वाट कधी संपेल याची शंका नसली तरी, चालताना प्रत्येक क्षणी पूर्णत्वाचीच अनुभूती यायची. त्या दृश्यांनी, त्या वाऱ्याने, त्या वाटेच्या सोबतीने मन अधिक समृद्ध झालं. जीवनसुद्धा असंच असतं. आपण ध्येयानं भारलेलो असतो, काहीतरी गाठायचं म्हणून धावपळ करत राहतो. पण गाठण्याच्या घाईत आपणचं गमावून बसतो—हसणं, श्वास घेणं, नाती जगणं, अनुभवांचा आस्वाद घेणं. जणू एखादा प्रवासी, ज्याला गंतव्य गाठायची घाई आहे, पण मार्गावर उमललेली फुलं पाहण्याचं भान नाही. आपलं जगणं म्हणजे पूर्णव...

"शांततेचा श्वास…"

इमेज
  🌿 "शांततेचा श्वास…" 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी मनुष्याच्या हातात जगातील सर्व काही नसतं. पण तो कायम सर्व काही आपल्या ताब्यात आहे, या गैरसमजुतीने झगडत राहतो. नियंत्रणाच्या पाशात गुरफटून जगणं म्हणजे पाण्याला मूठीत पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न— जितकं घट्ट पकडू, तितकं ते फसगत करत सुटतं. जीवनाच्या प्रवाहात अनेक वळणं येतात— कधी सौम्य, कधी उग्र. समोर उभ्या राहणाऱ्या लाटांना थांबवणं आपल्याला शक्य नसतं. पण त्या लाटांत डुबून न जाता, तरंगण्याची किमया आपण शिकू शकतो. एक छोटं उदाहरण घ्या— पावसाळ्यातील नदी. तिला आपण थांबवू शकत नाही, पण तिच्या तीरावर उभं राहून तिच्या गतीचं सौंदर्य अनुभवू शकतो. ती वाहणार, धावणार, कुठे दगडांना धडकणार, कुठे शांततेत विसावणार— पण आपण फक्त साक्षीदार होऊ शकलो, तर मनाला एक अद्भुत शांती लाभते. मनुष्याचं आयुष्य म्हणजे असंच आहे. काही गोष्टी आपल्या सामर्थ्याच्या बाहेर असतात. त्या रोखण्याच्या उर्मीने आपण स्वतःलाच जखडून घेतो. पण ज्या क्षणी आपण त्यांना वाहू देतो, स्वीकारतो, त्या क्षणी आपल्यामध्ये नवी प्रकाशरेषा जन्म घेते. भगवद्गीता सांगते — “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेष...

"अशक्याच्या पलीकडची वाट…"

इमेज
  🌿 "अशक्याच्या पलीकडची वाट…" 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी मनुष्याच्या प्रवासात दोनच मार्ग सतत समोर येत असतात — एक सोपा, गुळगुळीत, परिचित. आणि दुसरा काटेरी, अनोळखी, धडकी भरवणारा. पहिल्या मार्गावर लोकांची गर्दी असते. सगळे सांगतात — “हा सुरक्षित आहे, इथून जा.” पण दुसऱ्या मार्गावर शांतता असते, भीती असते, शंकेचं सावट असतं… आणि एक अवघड प्रश्नही — “मी खरंच हे करू शकेन का?” याच क्षणी माणूस आपली खरी परीक्षा देतो. तत्त्वज्ञान सांगतं: जगात काहीही अशक्य नाही. ‘अशक्य’ हा शब्द म्हणजे माणसाच्या भीतीला दिलेला फक्त एक देखावा आहे. जेव्हा मनुष्य ‘मर्यादा’ स्वीकारतो, तेव्हा तो ‘अशक्य’च्या चौकटीत अडकतो. आणि जेव्हा तो मर्यादा नाकारतो, तेव्हा तो ‘अनंत शक्यता’ या दारातून पुढे जातो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात — “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” (तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची चिंता करू नकोस.) फळाच्या भीतीतूनच ‘अशक्य’ जन्म घेतं; पण कर्मावरचा विश्वास माणसाला ‘अमर्याद’कडे नेतो. आपले संत तुकाराम म्हणतात — “अशक्य तें शक्य करीसी, करुणा केली तुजसी।” हा अनुभव सांगतो की कृपाशक्ती, विश्व...

अति लघु कथा - *शब्दांचं कवच*

  अति लघु कथा अलक *शब्दांचं कवच* “तू खूप काही करू शकतोस”… तिने म्हटलं, आणि त्याच्या अंगात थांबलेली ताकद पुन्हा उसळली." सुनिलदत्त कुलकर्णी

शेवटी तिलाही सोडलं

  शेवटी तिलाही सोडलं शेवटी तिलाही सोडलं त्याने घर सोडलं गाव सोडलं देश सोडला आणि शेवटी तिलाही सोडलं

🌿 "सुगंध-नदी…" 🌿

इमेज
  🌿 "सुगंध-नदी…" 🌿 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी मनाच्या डोंगररांगांमधून एक नदी वाहते — तिला नाव नसतं, किनारा नसतो, आणि तिचं पाणी कधीच आटत नाही. ती नदी म्हणजे सुगंध… आठवणींचा, भावनांचा, नजरेत न उमटलेल्या वचनांचा. कधी ती मंद झुळूक असते — एखाद्या फुलाच्या श्वासाइतकी हळवी, तर कधी ती ओसंडून वाहते — जणू भूतकाळाने वर्तमानाला घट्ट कवटाळलंय. ती नदी काळाच्या पायाखालची वाळू काढून घेते… आणि काळ क्षणभर थबकतो. ऋतू बदलतात, पाने गळतात, रंग फिके पडतात, पण या नदीचं पाणी ताजं, उबदार आणि जिवंत राहतं. कधी वाटतं, तिचा उगम कुठे असेल? पहिल्या नजरेच्या उसासात? एखाद्या पावसाळी दुपारी हातात हात गुंफलेल्या पायवाटेवर? किंवा एखाद्या न बोललेल्या, राहून गेलेल्या शब्दाच्या सावलीत? या सुगंध-नदीचं वैशिष्ट्य एकच — ती वाहते फक्त मनाच्या गुप्त भूमीवर. बाहेरच्या जगाला तिचा प्रवाह कधीच दिसत नाही, पण आपल्या आत ती लाटांवर लाटं उसळवत राहते. त्या लाटांवर वाहत येतात जुनी दृश्यं, जुने आवाज, जुने स्पर्श… आणि ते पुन्हा-पुन्हा नवे वाटतात. काळ किनाऱ्यावर उभा राहून या नदीकडे असहाय नजरेनं पाहत राहतो. त्याला ठाऊक असतं — ...

'ऑपरेशन सिंदूर'

  'ऑपरेशन सिंदूर' कधी लाजरेपणाचं, कधी श्रद्धेचं, कधी सौंदर्याचं – असं मानलं गेलेलं कुंकू, एका क्षणी अस्मितेचं, स्फोटाचं आणि अस्तित्वाचं प्रतीक बनतं. एका थेंबात मावत नाही हे कुंकू; त्यात अनेक थेंबांचा इतिहास मिसळलेला असतो – घामाचा, अश्रूंचा, आणि वीरमरणाचा. 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ एक युद्ध कारवाई नाही – ती आहे भावनेचा चक्रव्यूह मोडणारी सर्जिकल कथा.

अलक- जुना ब्लेझर

  अलक "कपाटात त्याच्या एक जुना ब्लेझर होता, स्वप्नांचा—जो मुलीच्या लग्नात घालण्यासाठी जपून ठेवलेला." स्पष्टीकरण: या वाक्यातील अर्थ खोल आणि भावनात्मक आहे. एक जुना ब्लेझर म्हणजे एक जुना पण त्याच्यासाठी खूप मौल्यवान कोट. तो केवळ कपडाच नाही, तर त्या वडिलांच्या मनातील स्वप्नांचे प्रतीक आहे. त्याने तो ब्लेझर अनेक वर्षे जपून ठेवला होता — कारण त्याच्या मनात एक सुंदर स्वप्न होतं: आपल्या मुलीच्या लग्नात, अभिमानाने, आनंदाने तो कोट घालून सहभागी होण्याचं. मात्र हे वाक्य सांगतंय की आता तो कोट "कपाटात" आहे — म्हणजेच वापरला गेला नाही. मुलीच्या लग्नात तो घातला गेला नाही, कदाचित... कारण ती मुलगी बापाच्या इच्छेविरुद्ध, एकटीच, किंवा पळून जाऊन लग्न करते. आता तो ब्लेझर तसाच आहे— "स्वप्नांचा", पण त्याचा वापर न झालेला, आणि त्या स्वप्नांच्या तुटलेल्या आठवणींनी भरलेला. हा केवळ एक वस्त्राचा उल्लेख नाही, तर एका बापाच्या स्वप्नभंगाची निशाणी आहे.

३० अति लघुकथा (अलक)

  अति लघुकथा (अलक) १ लेक म्हणाली, “बाबा, तुमच्यासारखंच ठाम राहिले मी!” ते हसले… स्वतःच्या संस्कारांचं शस्त्र त्यांच्या अंगावरच फिरलं होतं. २ लेक म्हणाली, “मी खुश आहे.” बाप म्हणाला नाही – “मी नाही.” ३ बाबा, तो मला समजतो..." ते म्हणाले नाहीत – "पण तुला मी समजत नव्हतो का?" ४ “बाबा, तुम्हीच शिकवलं ना आत्मनिर्भर व्हायला!” ते म्हणाले, “स्वतःवरच चाल करून घ्यावं, हे नव्हतं शिकवलं.” ५ “मी जात आहे…” लेक म्हणाली. “तू आधीच गेली आहेस,” बाबा म्हणाले… मनातून. ६ लेक म्हणाली – "बाबा, तुमचंही प्रेम होतं!" ते म्हणाले – "हो… पण माझं तू नाकारलं होतंस." ७ मुलीच्या डोळ्यांत वडिलांना प्रश्न दिसले, ते शांतच राहिले – उत्तर तिच्या निर्णयात होतं. ८ ती विचारायची – “बाबा, रागावला का?” ते म्हणायचे – “नाही ग… फक्त उरलो नाही.” ९ ती म्हणाली, “आई होती म्हणून धैर्य आलं.” ते हसले – “म्हणजे मी फक्त धाक होता का?” १० "माझं प्रेम खरं आहे, बाबा!" – ती ओरडली. ते शांत राहिले – त्यांचंही होतं, पण त्याचं वजन मोजणारा कोण? ११ ती म्हणाली – "बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही?" ते म्...

नातं

नातं   वासना संपली , आकर्षण संपलं , की नातं मग बोचत राहतं. का आपण असं केलं ? म्हणून सतत मन टोचत राहतं ----सुनिलदत्त कुलकर्णी