तिचं प्रेम अभंग राहिलं… विश्वास मात्र भंग झाला
तिचं प्रेम अभंग राहिलं… आमचा विश्वास भंग झाला (एक गोष्ट मात्र खरी— आज मनात पूर्वीसारखा ओलावा उरलेला नाही, म्हणून कालचा जिव्हाळा खोटा ठरत नाही. तो तेव्हा खरा होता. अगदी निखळ होता. कदाचित म्हणूनच आजची वेदनाही इतकी खरी आहे. जिथे काहीच नसतं, तिथे काही तुटतही नाही. तडा त्यालाच जातो, जे कधीतरी घट्ट जोडलेलं असतं.) ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, वाळूज तिचा प्रेमावर विश्वास होता. आणि त्यांचं विश्वासावर प्रेम होतं. दोन्ही भावना खऱ्या होत्या. दोन्ही आपापल्या जागी निर्मळही असतील. तरी एका वळणावर असं काही घडलं की तिचं प्रेम अभंग राहिलं आणि एका नात्याच्या पायाला नकळत तडा गेला. दुःख तिच्या प्रेमाचं नव्हतं. मनाने कुणाकडे ओढ घ्यावी, कुणाच्या सहवासात आपलं उद्याचं आयुष्य पाहावं, कुणाचा हात धरून पुढची वाट चालावी—हे शेवटी त्या मनानेच ठरवायचं असतं. प्रेमाला आज्ञा देता येत नाही. त्याला जातीची, प्रतिष्ठेची, अपेक्षांची किंवा समाजाने आखून दिलेल्या चौकटींची भाषा नेहमीच समजते असंही नाही. वेदना प्रेमाची नव्हती. ती होती— आपण इतके जवळ असूनही एखाद्या महत्त्वाच्या सत्यापासून इतके दूर कसे राहिलो? नात्यांना दुखावणारे...