मन जिथे हलकं होतं…
मन जिथे हलकं होतं… ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी कधी कधी आपण कुठे राहतो याला काही अर्थ नसतो. महत्त्वाचं असतं — आपण कुठे थांबतो ते. कारण राहणं म्हणजे भिंतींच्या आत असणं, आणि थांबणं म्हणजे मनाच्या आत विश्रांती मिळणं. घर महाग, परफेक्ट, डिझाइनर असलं तरी मनावरची धग जर न पुसली गेली — तर सोन्याचे झुंबरसुद्धा तुरुंगाच्या पट्ट्या भासू शकतात. आणि कुठल्या तरी साध्या मळ्यातल्या उन्हात तापलेल्या ओसरीवर, दोन मातीच्या कपातला गरम चहा आणि दोन चार हसरे शब्द — हेच राजसुख देऊन जातात. माणसाचं मन फार विचित्र आहे… अगदी क्षुल्लक ठिणगीने पेटतं आणि पर्वताएवढ्या पडझडीतही टिकून राहतं. त्याला नात्यासाठी, लोकांसाठी, जबाबदारीसाठी कोणाकडे जाऊन हलकं व्हावं हे अपूर्वपणे कळतं. पण आपण मात्र त्या उलट — जिथे ओझं आहे, तिथेच मुक्काम करतो. गणू बापू एकदा म्हणाला होता – “डोकं दुखलं की गोळी घेतो, पण मन दुखलं की आपणच ते आणखी दाबत बसतो. कारण आपण मनाच्या जखमांना ‘काळजी’ नव्हे, काळ समजून बसलो आहोत.” किती अचूक, किती धडधडीत. आपण ज्या नात्यांमध्ये थोडावेळ थांबायला होतं, त्यातच संपूर्ण आयुष्याची मांडवळ करतो. जिथे फक्त ओढवून द्यायच...