*इच्छा* - कविता
*इच्छा*
संघर्षाला माझ्या कुठे दिवस
तर कुठे काळोखी *रात* आहे
छळणाऱ्यांमध्ये कधी परक्यांचा,
कधी स्वकीयांचाही *हात* आहे.
जे जसे ते तसे, स्वीकारणे
ही कुठे नवी *बात* आहे.
शेवटचा क्षण *साजरा* व्हावा
हीच इच्छा *अंतरात* आहे
© वनिसुत ६.३.२५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा