⚡ "मनाचं सबस्टेशन" ⚡ — एका इमोशनल इंजिनिअरचं अंतःकरण
⚡ "मनाचं सबस्टेशन" ⚡
— एका इमोशनल इंजिनिअरचं अंतःकरण
✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी
सकाळी ऑफिसला जाताना मी रोज पाहतो एक विशाल सबस्टेशन…
ते उभं असतं — भक्कम, न बोलणारं, आणि तरीही सगळ्याचं उत्तर देणारं.
त्या संरचनेच्या मागे एक शांतता असते, पण ती ही... जागरूक शांतता.
ते बघितलं की मला स्वतःची आठवण येते.
"हे बघ, तुझ्यासारखंच आहे हे सबस्टेशन — भार झेलणारं, आवाज न करणं, आणि नेहमी ऑन ड्युटी!"
मीही एका अदृश्य सबस्टेशनचा ऑपरेटर आहे — मनाचं सबस्टेशन.
तिथे वीज नव्हे, भावना वहातात. विचारांच्या तारांवरून, नात्यांच्या फीडरमधून, आणि जबाबदाऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरमधून.
या मनाच्या सबस्टेशनमध्ये मेंटेनन्स जरासाही ढासळला… की सिस्टीम ट्रिप होते.
तेव्हाच जाणवतं — भावनाही जळतात, त्या सुद्धा ओव्हरलोडनं.
रोज नवा लोड असतो —
कधी बदल्यांचा पोल फेल होतो, कधी व्यवस्थापनाचं लो-व्होल्टेज निर्णय.
कधी अनुभवी सहकाऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर बर्न होतो,
तर कधी नव्या माणसांच्या अनिश्चित प्रतिक्रियांना हाताळण्यासाठी मी स्वतःचं ग्राउंडिंग तपासत बसतो.
कधी कधी वाटतं —
"सगळं डिएक्टिव्हेट करावं का? ह्या मेंटल सबस्टेशनचाच शटडाऊन घ्यावा का?"
पण लगेचच उत्तर येतं —
"शटडाऊन घेतलास तर तुझ्या घरात अंधार पसरेल… ऑफिसातही अनिश्चिततेचा ब्लॅकआऊट येईल."
कधी एखाद्या अनुभवी माणसाच्या निरोपानंतर मनात एक ओपन स्विच उघडतो —
त्या आठवणींचा स्पार्क हृदयात काही सेकंद राहतो…
"जुनं काही जातं… की आत काहीसं वीजेसारखंच हलतं!"
नवीन माणसं येतात, पण त्यांच्या शुद्धभावनेची “फॉल्ट कॅपेसिटी” अजून मी निरीक्षणातच ठेवतो.
मनातला ब्रेकर — अजून उघडाच असतो…
या सगळ्याला तोंड देताना,
मी रोज एक लाइटिंग अरेस्टर लावतो — तो म्हणजे 'आत्मसंयम'.
तोच माझं मन सांभाळतो.
कधी भावना शॉर्ट सर्किट होतात,
कधी कंट्रोल रूममध्ये फक्त एक सुस्कारा भरतो… पण मी कुणालाच दाखवत नाही.
SCADA स्क्रीनवर डोळा असतो —
पण घरातले विचार विचारतात —
"तू इथे आहेस ना पूर्ण वेळ?"
आणि मी हसून उत्तर देतो —
"हो... पण मन अजूनही अलार्मच्या प्रतीक्षेतच आहे."
आणि एक दिवस असा येतो —
जेव्हा स्वतःचं मनच ट्रिप होतं.
कोणी समजत नाही —
कारण हे सॉफ्ट फॉल्ट्स असतात.
ना धूर, ना स्पार्क,
फक्त आतल्या वायरिंगमध्ये शांत आगीसारखं काहीतरी होत राहतं…
तेव्हा मी स्वतःलाच विचारतो —
"किती दिवस हा भार झेलणार आहेस रे?"
आणि मग पुन्हा उठतो…
स्वतःचा ब्रेकर ON करतो,
Relay रिस्टोअर करतो,
Self Reset करतो… आणि स्वतःला सांगतो —
"तू इंजिनिअर आहेस —
फक्त वीज नाही,
तर विश्वास, धीर, आणि आधारही वाटतोयस तू!"
🌅⚡ मनाचं सबस्टेशन चालू राहिलंच पाहिजे… कारण तिथूनच तर जीवनाच्या उजेडाची लाईन जाते! ⚡🌅
आपल्याला हे लेखन कसे वाटले? कोणता भाग सर्वात जास्त भावला?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा