३० अति लघुकथा (अलक)
अति लघुकथा (अलक)
१
लेक म्हणाली, “बाबा, तुमच्यासारखंच ठाम राहिले मी!”
ते हसले… स्वतःच्या संस्कारांचं शस्त्र त्यांच्या अंगावरच फिरलं होतं.
३
बाबा, तो मला समजतो..."
ते म्हणाले नाहीत – "पण तुला मी समजत नव्हतो का?"
४
“बाबा, तुम्हीच शिकवलं ना आत्मनिर्भर व्हायला!”
ते म्हणाले, “स्वतःवरच चाल करून घ्यावं, हे नव्हतं शिकवलं.”
५
“मी जात आहे…” लेक म्हणाली.
“तू आधीच गेली आहेस,” बाबा म्हणाले… मनातून.
६
लेक म्हणाली – "बाबा, तुमचंही प्रेम होतं!"
ते म्हणाले – "हो… पण माझं तू नाकारलं होतंस."
७
मुलीच्या डोळ्यांत वडिलांना प्रश्न दिसले,
ते शांतच राहिले – उत्तर तिच्या निर्णयात होतं.
८
ती विचारायची – “बाबा, रागावला का?”
ते म्हणायचे – “नाही ग… फक्त उरलो नाही.”
९
ती म्हणाली, “आई होती म्हणून धैर्य आलं.”
ते हसले – “म्हणजे मी फक्त धाक होता का?”
१०
"माझं प्रेम खरं आहे, बाबा!" – ती ओरडली.
ते शांत राहिले – त्यांचंही होतं, पण त्याचं वजन मोजणारा कोण?
११
ती म्हणाली – "बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही?"
ते म्हणाले – "माझं म्हणणंच नाही राहिलं."
१२
ती म्हणाली – "तुमचं प्रेम मालकीचं होतं, बाबा!"
पण ते म्हणाले नाहीत – "तुझं प्रेम फक्त बंडखोरीचं होतं. बेटु"
१३
ती म्हणाली – "तुमचं प्रेम दडपण होतं, बाबा!"
ते म्हणाले – "हो… तूच होतीस माझा श्वास – म्हणून थोडंसं घट्ट धरलं होतं. बेटा"
१४
ती म्हणाली, “मी अजूनही तुमचीच आहे!”
ते म्हणाले, “पण आता मी तुझा नाही उरलो.”
१५
ती नवऱ्याला घेऊन आली – “हे पाहा, माझं जग.बाबा”
ते म्हणाले – “माझं संपलंय, पहायचं काही उरलेलं नाही.”
१६
कधी काळी तिनं ‘बाबा’ म्हटलं की हृदय फुलायचं,
आता तेच दोन अक्षरं ऐकून श्वास घुसमटतो.
१७
ती म्हणाली – “तुमच्या संस्कारांवरच चाललंय माझं बाबा!”
ते म्हणाले – “म्हणूनच मी मूक झालो.”
१८
ती विचारायची – “माझं काय चुकलं? बाबा”
ते विचारायचे – “माझं काय खरं होतं?”
१९
तिनं लग्न ठरवलं, आणि बोलली – “बाबा, तुम्हीच शिकलवलं ना प्रेम करायला!”
ते म्हणाले – “हो… पण फक्त स्वतःवर नाही.”
२०
तिच्या लग्नात त्यांनी 'हो' म्हटलं,
पण हृदयात 'ना' इतकं मोठं होतं की आवाजच दबला.
२१
ती म्हणाली – “बाबा, मी स्वतःचं जग निवडलं.”
ते म्हणाले – “आणि माझं संपवलं.”
२२
ती विचारायची – “बाबा, मला विसरलात का?”
ते म्हणायचे – “तू स्वतःच विसरलीस – आधी!”
२३
ती फुलांसारखी वाढली होती,
पण निघताना काटा ठरली.
२४
ती म्हणाली – “तुम्हाला कळलंच नाही मी किती तुटले होते.”
ते म्हणाले – “मग मी इतका तुटलो, ते पाहिलंच नाहीस का?”
२५
ती तिच्या नवऱ्याला म्हणाली – “हे माझे बाबा…”
ते मनात म्हणाले – “होतो.”
२६
ती बोलायची – “बाबा, तुमचं प्रेम खूप भारी होतं!”
ते म्हणायचे – “पण तुला झेपलं नाही…”
२७
ती आठवणीने परत आली,
ते आठवणीने निघून गेले होते.
२८
ती म्हणाली – “बाबा, तुम्ही नेहमीच अबोल का?”
ते म्हणाले – “तू जेव्हा गेलीस तेव्हाच शब्द हरवले.”
२९
ती म्हणाली – “बाबा, पुन्हा सुरुवात करूया?”
ते म्हणाले – “मी संपूर्णच संपलोय ग आता.”
३०
ती विचारायची – “बाबा, तुमचं काही राहिलंय का?”
ते म्हणायचे – “हो… फक्त तुझा न राहिलेलं मी.”
© सुनिलदत्त कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा