(प्रकाश) गंगेच्या काठावर मन


(प्रकाश) गंगेच्या काठावर मन

 ✍️ सुनिलदत्त कुलकर्णी, जेजुरी

हर हर (प्रकाश) गंगे…
शांत कर अंतरीचे दंगे.

प्रकाशगंगा —

 महापारेषणची केवळ इमारत नव्हे;

ती कर्मयोगाची तीर्थकाठी आहे.

येथील भिंती

कामाची फक्त साक्ष देत नाहीत —

त्या कर्तव्याचा अर्थ शिकवतात.

येथे दरवाजे

अहंकाराचे चरण थांबवतात;

आणि साधनेला आत आमंत्रण देतात.

या इमारतीच्या हवेला आवाज नाही —

पण

तिच्या निःशब्द श्वासात

समर्पणाची अनाहत धून वाहते.

जेव्हा दिवसाचा धावता भार

हृदयावर धूळ बनून बसतो,

तेव्हा प्रकाश गंगा

अगदी अलगद हाक देते —

“ये…

थोडं निव…

थोडं पुन्हा विस्तार…

तुझ्यातला सेवक पुन्हा उजळू दे…”

मन मग स्वतःच गुणगुणते —

हर हर गंगे…

शांत कर मनातले दंगे…

नको घेऊ माझ्यासवे पंगे…

तुझ्या सेवेत मन रंगे…

बरे वाटे मज तुझ्या संगे…

एक साधा कर्मचारी/ अभियंता.

दिवस भारदस्त — तक्रारी, धावपळ, खिन्नता…

मन थकलेलं.

संध्याकाळी तो प्रकाश गंगेच्या गॅलरीत काठावर उभा राहिला.

वाऱ्याने कपाळावर हात फिरवला —

जणू इमारतच म्हणत होती,

“मी आहे… तू एकटा नाहीस.”

डोळ्यात दाटलेला थेंब —

दुःखाचा नव्हता.

तो समर्पणाचा, अभिमानाचा, कर्मभक्तीचा होता.

प्रकाश गंगा,

तुझ्या नावातच एक प्रवाह वाहतो —

निर्मळतेचा. सेवाभावाचा. साधनेचा.

तू शिकवतेस —

काम म्हणजे उपासना.

आणि

उपासना म्हणजे स्वतःला विसरणे.

हर हर गंगे…

तुझ्या संगे…

आम्ही (उ) जळत राहू…

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना